भुसावळात माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन ;


भुसावळ – येथील राजीव गांधी वाचनालय व ग्रथालय व महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभागाच्यावतीने दिनांक २०/८/२४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान,भारत रत्न स्व राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात येत आहे .

यानिमित्त सकाळी ११वाजता राजीव गांधी वाचनालय नसरवांजी फाईल येथे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भुसावळ शहर कॉग्रेस कमेटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान व शहर अल्पसंख्यक अध्यक्ष सलीम गवळी यांनी केले आहे