शिंदी, ता. भुसावळ — येथे गावातील रहिवासी भूमिपुत्र तथा पनवेल येथील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक लालसिंग राजपूत व एम एस सी बँक अधिकारी मुंबई रामलाल सुकलाल पाटील (नानाभाऊ) यांच्या संकल्पनेतून गावात 18/ 8 /2024 रविवारी वृक्ष दिंडी काढण्यात आली व त्या वेळेला संपूर्ण गावात ट्रॅक्टर द्वारे घरोघरी वृक्षांचे वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायत विकास सोसायटी गावातील विविध मंडळे भजनी मंडळ या सर्वांच्या सहकार्यातून व वरील दोन्ही मान्यवरांच्या संकल्पनेतून गावात प्रथमच निंब ,वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, वृक्षांचे वाटप करण्यात आले. अशोक राजपूत व नानाभाऊ पाटील यांनी ग्रामस्थांसाठी विनामूल्य रोपे उपलब्ध करून दिले.
गावात दिंडीद्वारे वृक्षांचे वाटप करण्यात येऊन झाडे लावा– झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा! अशा प्रकारच्या घोषणा देऊन वातावरण निर्मिती केली. गावात अशा प्रकारचा प्रथमच उपक्रम असल्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. झाडे जगवण्याची शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.
—– गावासाठी भविष्यात विविध उपक्रम राबविणार— यावेळी पनवेल येथील सहाय्यक पोलीस आयुक्त तथा गावचे रहिवासी अशोक लालसिंग राजपूत यांनी सांगितले की, गावासह गावाच्या परिसरात येत्या काही वर्षात वृक्षांची लागवड करून संपूर्ण परिसर हिरवागार निसर्गरम्य करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच भविष्यात व्यसनमुक्ती ,पाणी अडवा- पाणी जिरवा, सामाजिक, शैक्षणिक, उपक्रम, गरजू, अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम अशा विविध उपक्रमांद्वारे वाचनालयाच्या माध्यमातून सोयी सुविधा ,लोकसहभाग व दानशूरदात्यांच्या माध्यमातून राबविल्या जातील. जेणेकरून गाव विकासाच्या वाटेवर जात राहील असे सांगितले.
यावेळी गावचे रहिवासी एम एस सी बँक मुंबईचे अधिकारी रामलाल पाटील (नानाभाऊ), सरपंच सौ. सुनीता संदीप सपकाळे, मा. प्र. सरपंच तथा उपसरपंच कैलास पाटील, विकास सोसायटी चेअरमन विलास पाटील ,माजी उपसरपंच जालमसिंग राजपूत, पोलीस पाटील अतुल पाटील, माध्यमिक शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष गिरीश नेमाडे, श्री समर्थ नर्सरीचे संचालक बन्सीलाल पाटील, मा. ग्रा.पं. सदस्य दिलीप कोल्हे, तसेच गावातील विविध मंडळांचे पदाधिकारी,गावातील भजनी मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.


