:भुसावळ – भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापनदिन भुसावळ शहर व परिसरात उत्साहाने साजरा करण्यात आला या निमित्त सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय , शाळा, महाविद्यालय , न्यायालये, राजकीय विविध पक्षाचे कार्यालय , यासह सामाजिक संस्था यांनी ध्वजारोहण करून तिरंग्यास मानवंदना दिली .

शासकीय ध्वजारोहण :
स्थानिक येथील बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पोलीस विभागातर्फे डीवायएसपी यांचे मार्गदर्शनाखाली बँडपथकासह ध्वजास मानवंदना देण्यात आली .तसेच स्वातंत्र्य सैनिक व शहिदांच्या वीर माता व पत्नी यांना संन्मानीत करण्यात आले
यावेळी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे , उपविभागीय पोलीस अधिक्षक कृष्णांत पिंगळे , मुख्याधिकारी महेश वाघमोडे ,नायव तहसीलदार ,पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ , गटशिक्षणाधिकरी किशोर वायकोळे , नायव तहसीलदार , बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ , शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले , यांचेसह महसूल विभागाचे अधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी ,प्रा डॉ सुनील नेवे , नगरसेवक परीक्षित ब-हाटे , राजेंद्र आवटे , राजेंद्र नाटकर , जेष्ठ समाजसेवक जे बी कोटेचा ,पालिका कर्मचारी , शिक्षक , स्वातंत्र सैनिक व नागरीक विविध शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक , व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी बँड पथकासहI पोलीस कर्मचारी, होमगार्ड पथकासह नागरिक उपस्थित होते
.प्रसंगी सर्वांनी राष्ट्रहितासाठी देशरक्षणासाठी , राष्ट्रीय एकोप्याची शपथ घेतली . यावेळी शहर पत्रकार संस्थेच्यावतीने मान्यवरांचे हस्ते आकाशात (बलून ) फुगे सोडण्यात आले . यावेळी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते . तर विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम व देशभक्तीपर गीत सादर केले . पालिकेतर्फे ठेवण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर चाहत्यासह उपस्थितांनी सेल्फी व फोटोचा मनमुराद आनंद घेतला . सूत्रसंचालन आबीद शेख सर यांनी केले .

भुसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा : विभागीय रेल्वे प्रबंधक इति पांडेय यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण:
भुसावळ – मध्य रेल्वे भुसावळ मंडळ कार्यालय येथे स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीमती इति पांडेय मंडळ रेल प्रबंधक भुसावळ यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच त्यांनी महाप्रबंधक मुबई यांच्या संदेशाचे वाचन करून स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मंडळ रेल प्रबंधक भुसावळ यांच्या हस्ते भुसावळ विभागातील एकुण ०३ महिला रेल कर्मचारी आणि ०१ पुरुष रेल कर्मचारी यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी वुमन मॅन ऑफ द मंथ जुलै 2024 या पुरस्काराने आणि नामांकित झालेले एकुण ०५ कर्मचाऱ्यांना देखिल सम्मानित करण्यात आले. तसेच विविध विभागाद्वारे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना समूह पुरुस्कार देऊन सम्मानित करण्यात आले.
श्रीमती इति पांडेय मंडल रेल प्रबंधक भुसावळ यांनी विविध विभागांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा केली. या कार्यक्रमास रेल्वे स्कुल मधिल विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी नृत्य सादर केले.
स्वतंत्रता दिवसाच्या कार्यक्रमास कार्यकारिणी सदस्या मध्य रेल्वे महिला कल्याण समिती भुसावळ सुनिल कुमार सुमन, ए.डी.आर.एम.(प्रशासन) भुसावळ , एम .के.मीना,सीपीएम/जीएसयु ,भुसावळ, एन. एस.काज़ी, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी भुसावळ तसेच सर्व रेल्वे अधिकारी भुसावळ आणी रेल्वे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वी. एस. वडनेरे, सहायक कार्मिक अधीकारी, भुसावळ यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजिनियरिंग विभाग, इलेक्ट्रिक विभाग, दूरसंचार विभाग, रेल्वे सुरक्षा बल विभाग आणी कार्मिक विभागातील कर्मचारी व सर्व कल्याण निरीक्षक यांनी अथक परिश्रम घेतले.



