भुसावळातील बेशिस्त वाहतूक नियंत्रणात आणणार – ए.पी.आय. उमेश महाले :

भुसावळ – भुसावळातील बेशिस्त वाहतूक सुरळीत करून शहर वाहतूक नियंत्रणात आणणार असल्याची ग्वाही शहर वाहतूक शाखेला नुकतेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले यांनी दिली . आगामी सणउत्सव लक्षात घेवून वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची प्रामुख्याने दखल घेवून शहरातील बेशिस्त वाहतूक चालकांना धडा शिकवणार असल्याचे उमेश महाले यांनी सांगितले . रुजू झाल्याबरोबर पहिल्यांदा बेशिस्त वाहतूक निदर्शनास आल्याने रस्त्यांच्या कडेला असलेली वाहने व रस्त्यात अतिक्रमण धारकांची पाहणी केली असून बेशिस्त वाहन चालकांना शिस्तीवर आणणार असल्याचे स्पष्ट केले .

जी व्यक्ती बेशीस्तपणे वाहन चालवेल वा तीन सीट बसून ,वाहन चालवेल वाहन चालवतांना मोबाईल वरून बोलणे,रस्त्याच्या कडेला वाहन उभे करणे,बुलेटच्या सायलन्ससर व्दारे कर्कश आवाज काढणे.तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर व डी.एल.हिंदी हायस्कुल बाहेरील परिसरात उभे असणारे रोड रोमियो यांच्याविरुद्ध शहर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाणार आहे.एवढेच नव्हे तर तापी पुलावर सायंकाळी गर्दी करणाऱ्या काही टवाळखोरांना सुद्धा सूचना देण्यात आल्या आहे. रिक्षाचालकांना शाळेत वेळेवर येणे व वेळेवर जाणे याबाबत विशेष महत्वपूर्ण सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले .

तसेच बुलेटवाहन चालक यांनी जर हेतुपूर्वक बुलेटचे सायलन्ससर मोठ्या आवाजात वाजवीत फटाके फोडत ध्वनी प्रदूषण केले तर जागीच वाहनांचे सायलन्ससर जप्त करण्यात येऊन सक्त कारवाई करण्यात येईल असा मौलिक सल्ला सुद्धा महाले यांनी दिला यावल रोडवरील शाळेच्या परिसरात काही वडा पाव विक्रेत्यांनी लोटगाडी लावल्या आहेत.यावर खवय्यांची झुंबड असल्याने रस्त्याचा अर्धा भाग हा त्यांच्या वाहनांनी भरलेला असतो तर काही भागगर्दीमुळे व्यापलेला असतो त्यात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची व स्कुल बस रिक्षा वाहने यांची भर पडते अशा वेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

बस स्थानक परिसरात रस्त्याच्या दोघे बाजुंनी रिक्षा चालकांनी गर्दी केल्याने बस ये- जा करण्यासाठी अडचणी निर्माण होतात त्यात एकच रस्ताआहे व तिथे रिक्षा चालकांची मनमानी सुरू आहे.अशा बेशिस्त रिक्षा चालकांना सूचना देण्यात आल्या असून लवकरच बेशिस्त वाहनचालकांना शिस्तीवर आणणार असल्याचेही उमेश महाले म्हणाले .