महाराणा प्रताप विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

भुसावळ –
15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ, भुसावळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय, या शाळेमध्ये संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सोनू मांडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले,

याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी बँड पथकावर राष्ट्रगीत, राज्यगीत , झेंडा गीत, देशभक्तीपर समूहगीत यांचे सादरीकरण केले. या सामुदायिक गीताने शालेय परिसरातील वातावरण देशभक्तीने भारावून गेले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे सर, पर्यवेक्षक नारायण घोडके सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी, माजी विद्यार्थी व पालक बंधू-भगिनी व बहुसंख्य विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.