बियाणी स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा :



भुसावळ – राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल,भुसावळ येथे 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी सकाळी ठीक 8 वाजता .डॉ.सौ. संगिता बियाणी (सेक्रेटरी राष्ट्रीय शिक्षा समिती )यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी.मनोज बियाणी (अध्यक्ष राष्ट्रीय शिक्षा समिती),विनोद बियाणी सर, .सौ. स्मिता विनोद बियाणी, . रोनक बियाणी , .सौ आयूषी बियाणी, राजेश पारीख सर, . प्रविण भराडिया सर , शाळेचे मुख्याध्यापक रुद्र सिंग गंठिया आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार ध्वजगीत,राष्ट्रगीत सादर केले. तसेच हेड बॉय, हेड गर्ल यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे शेवटी शाळेचे मुख्या. रुद्रसेन गंठिया यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले