अहिल्यादेवी कन्या विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा :

भुसावळ – शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर संस्था श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात 78 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..

ध्वजारोहण संस्थेच्या चिटणीस श्रीमती उषाताई पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले… यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी , पर्यवेक्षक श्री संजीव पाटील उपस्थित होते.. कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सांघिक
राष्ट्रगीत, झेंडा गीत, समूहगीत सादर केले
ध्वजारोहण समारंभास विद्यालयातील विद्यार्थिनी, पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजय डोळे सर यांनी केले .. कार्यक्रमाच्या शेवटी भारत माता की जय, वंदे मातरम ,स्वातंत्र्य दिन चिरायू होवो या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला…कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले