बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ;


भुसावळ :
15 ऑगस्ट रोजी देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिवस बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज बियाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या 1100 विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने पथ संचलन करत मानवंदना दिली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत तसेच देशभक्तीपर नृत्य सादर केले. संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना देशभक्ती व देश सेवेचे महत्त्व विशद केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहुणे व शाळेचे विद्यार्थी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विनोद बियाणी ,सचिव डॉ. संगीता बियाणी कार्यकारी संचालीका स्मिता बियाणी, कार्यकारी संचालक रोनक बियाणी, राजूभाऊ पारिख, प्रवीण भराडिया, सौ आरुषी रोनक बियाणी, शाळेचे प्राचार्य डी एम पाटील शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ कांचन जोशी, बियाणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य रुद्रसेन गंठिया तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.