” पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा ” – प्रा डॉ सुनिल नेवे : रोटरी क्लब ऑफ भुसावळचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ –
रोटरी क्लब ऑफ भुसावळ मधे प्रा. डॉ. सुनील नेवे यांचे सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणारे अतिशय सुंदर ओघवत्या शैलीत पाठीवर “हात फक्त लढ म्हणा” या विषयावर कवी कुसुमाग्रजांच्या “कणा” या कवितेचा संदर्भ देऊन व्याख्यान झाले. या प्रसंगी रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य जेष्ठ नागरिक, व भुसावळ मधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
रोटरी क्लबचे सदस्य सामाजिक कार्य करतात त्यामुळे गरजू गरीब लोकांना मदत मिळते , व या मिळालेल्या मदतीमुळे ब-याच वेळा कोणेचे तरी आयुष्य बदलते व हे समाज ऋण रोटरी क्लब आँफ भुसावळचे सर्व मेंबर्स अतिशय चांगल्या रीतीने फेडतात व यातुनच चांगला समाज घडतो. असेही यावेळी डॉ. नेवे यांनी सांगितले.
या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष अनंत पाटील प्रस्ताविक केले. सचिव आरती चौधरी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली. .
मंगला पाटील यांनी डॉ. नेवेंची ओळख करून दिली. आभार प्रा.निता चोरडिया यांनी केले.
या प्रसंगी महेश भराडे,शितल भराडे, चारू महाजन, विकास कात्यायनी, सारंग चौधरी, रूपेश जैन,निलम जैन, हेमंत नाईक, स्वाती नाईक, राजेश अग्रवाल, विनीता अग्रवाल, दिलीप खंडेलवाल, अनिता खंडेलवाल , वैशाली पाटील, मदन बोरकर व संजय चापोरकर, हजर होते
तसेच जेष्ठ नागरिक संघाचे प्रकाश विसपुते, आर. एल. पाटील,दिनकर पाटील हजर होते.