परप्रांतीय 24 वर्षीय तरुणीचा विहिरीत आढळला मृतदेह : अमळनेर तालुक्यातील घटना –

अमळनेर : 24 वर्षीय परप्रांतीय तरुणीचा मृतदेह राहणार्‍या भागातील नजीकच्या विहिरीत आढळून आला. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीला आली. या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रिनाबाई बिरबल पाडवी (24, रा.पानसेमल, ता.बडवानी, मध्यप्रदेश ह.मु.चौबारी, ता.अमळनेर) असे मयताचे नाव आह
रिनाबाई ही आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. सोमवार, 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता रिनाबाई पडवी हीने घरात कुणाला काहीही न सांगता घर सोडले. नातेवाईकांनी तिचा शोध घेतल्यानंतर माहिती न मिळाल्याने मारवड पोलिसात हरवल्याची खबर नोंदवण्यात आली मात्र बुधवार, 14 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता गावातील राहत असलेल्या परिसरातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिच्या नातेवाईकांसह मारवड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.