सकल हिंदू समाजातर्फे भुसावळ बंदची हाक : निषेधार्थ भव्य मुक मोर्चाचेही आयोजन : अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळणार.


भुसावळ –.बांगलादेशातील अल्प संख्य हिंदू, बौद्ध, नागरिक, अबाल वृद्ध, महिला पुरुष जेष्ठ नागरिकांवर खुलेआम माणुसकीला लाजवेल असे अन्याय अत्याचार सुरु आहेत . तेथील हिंसाचारात शेकडो हिंदू कुटुंब,मॉल ,दुकान , घर वस्त्या, हॉटेल्स जाळण्यात येऊन उद्ध्वस्त करण्यात आल्यात,हिंदू अल्पसंख्य पोलिसांना जाळण्यात आले .महीलांवर् त्यांचे कुटुंबासमोर अत्याचार करून त्यांना व त्यांचे कुटुंबातील सर्वांची हत्या करण्यात येऊन त्यांना फाशी देण्यात आली . तेथील लष्कराने सुद्धा तेथील अल्पसंख्य हिंदुं वर अत्याचार केले .तेथील घटना या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या लज्जास्पद आहेत , महिलांचां आणि, संस्कार संस्कृतीचा अपमान करणाऱ्या वेदनादायी आहेत. या अशा निंदनीय घटनेचा जाहिर निषेध करण्यासाठी व तेथील अल्पसंख्याक हिंदूंवरील होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबविले जावेत व याची दखल जागतिक मानवाधिकार आयोगाने घ्यावी

यासाठी दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी भुसावळ शहर व परीसरात कडकडीत बंद पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दिनांक 16/8/2024 रोजी याच् घटनेच्या निषेधार्थ भव्य मुक मोर्चाचेही आयोजन सकाळी 10वाजता अष्टभुजा देवी मंदीर ते प्रांत कार्यालय भुसावळ पर्यंत करण्यात आलेले असून यासाठी हजारोंच्या संख्येने सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आलेले आहे. याप्रसंगी भुसावळ शहर आणि परिसरातील विविध सामाजिक, दुकान, किराणा,व्यापार, उद्योग , हौकर्स असोसिएशन,अध्यात्मिक संस्था, शाळा महाविद्यालय संस्थाचालक संघटना, चालक मालक वाहक संघटना,विविध समाज मंडळाचे प्रमुख,गणपती व नवदुर्गा उत्सव मंडळ प्रमूख , विविध सांप्रदायांचे धर्मगुरू, मंदिर संचालन प्रमुख, पदाधिकारी,प्रतिनिधी उपस्थीत होते.