बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे शिशिर जावळे यांनी केली तक्रार-

. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे शिशिर जावळे यांनी केली तक्रार–
भुसावळ –.बांगलादेशातील अल्प संख्य हिंदू, बौद्ध, नागरिक, अबाल वृद्ध, महिला पुरुष जेष्ठ नागरिकांवर खुलेआम माणुसकीला लाजवेल असे अन्याय अत्याचार सुरु आहेत . तेथील हिंसाचारात शेकडो हिंदू कुटुंब,मॉल ,दुकान , घर वस्त्या, हॉटेल्स जाळण्यात येऊन उद्ध्वस्त करण्यात आल्यात,हिंदू अल्पसंख्य पोलिसांना जाळण्यात आले .महीलांवर् त्यांचे कुटुंबासमोर अत्याचार करून त्यांना व त्यांचे कुटुंबातील सर्वांची हत्या करण्यात येऊन त्यांना फाशी देण्यात आली . तेथील लष्कराने सुद्धा तेथील अल्पसंख्य हिंदुं वर अत्याचार केले .तेथील घटना या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या लज्जास्पद आहेत , महिलांचां आणि, संस्कार संस्कृतीचा अपमान करणाऱ्या वेदनादायी आहेत. य तेथील अल्पसंख्याक हिंदूंवरील होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबविले जावेत . यांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावे. तसेच या प्रकरणांमध्ये तेथील लष्कराने बांगलादेशातील धर्मांध लोकांना हिंदू अल्पसंख्याकांविरुद्ध केलेली मदत व हिंदू अल्पसंख्याकांवर केलेले अत्याचार याची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी व्हावी ,तेथील अराजकतेला कारणीभूत असणाऱ्या , हिंदू अल्पसंख्यांकांना निशाणा करणाऱ्या तेथे जातीय हिंसा,दंगली , घडविणाऱ्या देश आणि विश्वविघातक कृत्य करून देश आणि सत्ता काबीज करू पाहणाऱ्या धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या षडयंत्राची सुद्धा उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याबाबत ची मागणी तसेच हिंदू वरील अन्याय अत्याचार करणाऱ्या तेथील सर्व उपद्रवी बांगलादेशींवर त्वरित कारवाई करून तेथे शांती प्रस्थापित करण्याबाबत विनंती व तक्रार भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे(UNHRC) केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविलेले आहे.