माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त इ . १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शनचे आयोजन :

ठाणे – माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त सन २०२३ /२४ या शैक्षणिक वर्षात १० वी व १२ वीत ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कायक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे आयोजित हा सोहळा दिनांक ५ ऑगष्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे . प्रसंगी सर्व सहभागी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असून लकी ड्रा काढण्यात येणार आहे यामध्ये चार लॅपटॉप , व ६ मोबाईल टॅब देण्यात येणार आहे .या कार्यक्रमात माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट ) चे मान्यवर व प्रतिष्ठित उपस्थित राहणार आहे . विद्यार्थी व विद्यार्थिनीं व तसेच त्यांचे पालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे .