भारत मातेची सेवा करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी राख्या रवाना : नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगावचा स्तुत्य उपक्रम :

जळगाव नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे भारताच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांच्या रक्षणार्थ दिनांक १ ऑगष्ट २०२४ रोजी एकूण ५०० राख्या रवाना करण्यात आल्या. या राख्या सैनिक कार्यालय जळगाव येथे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोपान रामनाथ कासार, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय रामराव गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आल्या.

या राख्या जम्मू काश्मीर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, लेह लद्दाख या ठिकाणी सीमेवर रक्षण करणाऱ्या बांधवांसाठी पाठवण्यात आल्या. यावेळी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनिषा किशोर पाटील सचिव ज्योती राणे, नूतन तासखेडकर, नेहा जगताप,रेणुका हिंगु , हर्षा गुजराती, वंदना मंडावरे, राधिका पाटील याप्रसंगी उपस्थित होत्या.