लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांचे कार्य भविष्यकाळासाठी दीपस्तंभ आहे- प्रा. डॉ. दिनेश पाटील


भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचालित, कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.किशोर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दिनेश पाटील यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन व कार्य, त्यांचे साहित्य तसेच लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. जतीन कुमार मेढे, डॉ. सुनील नेवे, डॉ. पद्माकर सावळे, डॉ. मुकेश पवार डॉ.आशुतोष वर्डीकर, प्रा. भावना प्रजापती इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दिनेश महाजन यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. काशिनाथ पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.मोहिनी तायडे यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.