वंशिका प्रतिष्ठान तर्फे स्व.मोहम्मद रफी यांना श्रद्धांजली ;

भुसावळ – वंशिका प्रतिष्ठान तर्फे भारतीय संगीत क्षेत्रातील ख्यातनाम गायक स्व.मोहम्मद रफी यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी येथील पांडुरंगनाथ नगर, पूजा काॅम्प्लेक्स भुसावळ येथे श्रद्धांजली पर कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळेस सुरूवातीला संदिप बडगे यांच्या हातून दिप प्रज्वलन करून व स्व.मोहम्मद रफी यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
असंख्य गाण्यांमधून आपल्या आवाजातली जादू दाखवून हिंदी सिनेसृष्टीतील गायकांपैकी सर्वश्रेष्ठ गायकांच्या यादीत मोहम्मद रफींचं नाव घेतलं जातं. संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. या पुरस्कारांपेक्षा त्यांना अपेक्षित असलेला रसिकवर्ग त्यांना मोठ्या संख्येने लाभला. ३१जुलै १९८० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आवाजाच्या जादूगाराचं निधन झालं. मात्र आवाजाच्या रुपातून रफी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.
वंशिका प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील अनेक कलाकारांनी गीत गाऊन स्व.मोहम्मद रफी यांना स्वरांमधून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी विवेक नरवाडे,संभाजी सोनवणे,अखिलेश कुमार,निलेश रायपूरे, जितेंद्र उईके,दिलीप क्षीरसागर,हेमंत खरात,रोहित अडकमोल,वैशाली चोपडे,धम्मरत्न चोपडे,संतोष मेश्राम,प्रकाश लोडते,डि.एस.बर्डे,देवा आराख तसेच असंख्य नागरीक उपस्थित होते.