रेल्वे प्रशासनाची तत्परता : अपघातग्रस्त प्रवाशांची भुसावळ रेल्वेस्थानकावर विशेष सेवा !

*भुसावळ- अपघातग्रस्त ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने त्यांच्या इच्छीत स्थानकापर्यंत पोहोचवण्यासाठी हावडा-मुंबई मेल विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. विशेष गाडी बुधवारी ३१ जुलै रोजी सकाळी ११.४० वाजता भुसावळ स्थानकावर आल्यावर प्रवाशांसाठी जेवण, पाणी आणि वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय, गाडीतील सर्व प्रवाशांना रेल्वे आरोग्य विभागाच्या पथकाकडून वैद्यकीय मदत करण्यात आली आहे. औषधे आणि अन्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या तात्काळ व्यवस्थेमुळे प्रवाशांना मोठा आधार मिळाला आहे. रेल्वे वैद्यकीय विभागाच्या पथकाने विशेष ट्रेनमधील प्रत्येक डब्यात जाऊन प्रवाशांच्या आरोग्याची चौकशी केल्याचे पहायला मिळाले.