मुक्ताईनगर : शहरातील शिवसेनेच्या शिंदी गटातील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी रोहिणी खडसे यांनी या युवकांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.

यांनी केला पक्षात प्रवेश
यामध्ये दीपक चिंचोले (बाळा भाऊ), निलेश भारसाके, सलमान पिंजारी, अरमान पिंजारी, समीर पिंजारी, दर्शन ठाकूर, शुभम ठाकुर, रोशन झांबरे, योगेश माळी, रुपेश कवळे, योगेश जुमळे, मयुर हळपे, आशिष राजपूत, मयुर चव्हाण, मजीद शाह, ओम जुमळे, धीरज जुमळे, संतोष कवळे, स्वप्निल आवारे, ईशान बोराखडे, नारायण फिरके, संतोष धनगर, रहेमान पिंजारी, भावेश बागवान, विलास मराठे, कैलास मराठे, महेंद्र सपकाळे, अमोल सपकाळे, योगेश जुमळे, लोकेश पाटील, ओम माळी आदींनी प्रवेश केला.
शोषित घटकांना न्याय देणारा पक्ष
रोहिणी खडसे म्हणाल्या की, शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा शेतकर्यांच्या कष्टकर्यांच्या हितासाठी व नव तरुणांसह शोषित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द आहे. राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष हा सर्व समावेशक सर्व जाती धर्माला घेऊन विकासाच्या वाटेवर चालणारा पक्ष आहे. सर्वांना पक्षात योग्य सन्मान दिला जाईल. यावेळी यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बबलू सापधरे, प्रदीप साळुंखे, बापू ससाणे, संजय कोळी, संदीप जुमळे, राहुल पाटील, चेतन राजपुत, जितेंद्र पाटिल, निलेश भालेराव, विजय शिरोळे, अजय अढायके, राहुल बोदडे, रोहन महाजन उपस्थित होते.


