पुणे विभागातील दौंड स्थानक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येत आहे त्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात आहे.
नॉन इंटरलॉकिंग दिनांक २९.०७.२०२४ ते ०१.०८.२०२४ पर्यंत.
भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांवर नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक मुळे बदल खालीलप्रमाणे आहेत:
गाड्याचे रद्दीकरण –
१) गाडी क्रमांक १७६३० नांदेड -पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ३१.०७.२०२४ रोजी रद्द.
२) गाडी क्रमांक ११०२५ पुणे -अमरावती एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०१.०८.२०२४ रोजी रद्द.
३) गाडी क्रमांक १७६२९ पुणे -नांदेड एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०१.०८.२०२४ रोजी रद्द.
४) गाडी क्रमांक ११०२६ अमरावती -पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०१.०८.२०२४ रोजी रद्द.
गाडीचे मार्ग परिवर्तन –
१) गाडी क्रमांक २०६५८ हजरत निजामुद्दीन -हुबळी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २८.०७.२०२४ रोजी मनमाड,इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत, पुणे, मिरज, हुबळी मार्ग वळवली जाईल.
२) गाडी क्रमांक १७३२४ बनारस-हुबळी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २८.०७.२०२४ रोजी मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत, पुणे, मिरज, हुबळी मार्ग वळवली जाईल.
३) गाडी क्रमांक १२७७९ वास्को दि गामा -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ३१.०७.२०२४ रोजी पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्ग वळवली जाईल.
४) गाडी क्रमांक १२६३० हजरत निजामुद्दीन -यशवंतपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ३१.०७.२०२४ रोजी मनमाड,इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, मार्ग वळवली जाईल.
५) गाडी क्रमांक २२६८५ यशवंतपूर -चंदिगढ एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ३१.०७.२०२४ रोजी पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्ग वळवली जाईल.
६) गाडी क्रमांक ११०७८ जम्मूतवी -पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ३०.०७.२०२४ रोजी मनमाड,इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे, मार्ग वळवली जाईल.
डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल –
१) गाडी क्रमांक ११०३७ पुणे -गोरखपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०१.०८.२०२४ रोजी १६.१५ वाजता ऐवजी १८.१५ वाजता सुटेल.
२) गाडी क्रमांक ११०७७ पुणे – जम्मूतावी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०१.०८.२०२४ रोजी १७.५० वाजता ऐवजी २०.२० वाजता सुटेल.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन –
१) गाडी क्रमांक १२७८० हजरत निजामुद्दीन -वास्को दि गामा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ३१.०७.२०२४ रोजी पुणे विभागात ०३.३० तास नियमित केली जाईल.
२) गाडी क्रमांक १२१०४ लखनौ-पुणे प्रवास सुरु दिनांक ३१.०७.२०२४ रोजी पुणे विभागात ०२.४० तास नियमित केली जाईल.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.



