भुसावळ
आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरती दादासाहेब रामदास गणपत झांबरे माध्यमिक विद्यालयात एकदिवसीय अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रशांत वंजारी यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागा व्हावा यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबवल्या जातात याच माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले या मेळाव्यात जिल्हास्तरासाठी दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम मनीष माळी (महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव) द्वितीय पार्थ वानखेडे (सेंट अलायसिस हायस्कूल, भुसावळ) तृतीय आकांक्षा पाटील (श्री शारदा माध्यमिक विद्यालय, दिपनगर)
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे होते यावेळी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक व्हि.पी. शेजोळे संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत चौधरी शशिकांत झांबरे परीक्षक डॉ पी एस को, अविनाश मोरे जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे सदस्य नीलिमा पाटील विषय तज्ञ शिक्षक सचिन पाटील संजय गायकवाड आदी उपस्थित होते
सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्स संभाव्यता व आव्हाने या विषयावरती सहा मिनिटांचे माहिती दिली यानंतर परीक्षकांनी दोन मिनिटे प्रश्न विचारले.
विद्यार्थ्यांशी संवद साधताना किशोर वायकोळे म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही प्रणाली भविष्यात उपयोगी आहे यामुळे आपले अनेक कठीण कामे सोपे झाले आहे कोणताही विषय म्हटला की त्याचे फायदे असतात पण तसेच तोटे देखील असतात या प्रणालीचा आपण मानवाच्या कल्याणासाठी उपयोग केला पाहिजे या प्रणालीचे संभाव्य धोक्यांवरती देखील काम झाले पाहिजे व त्यापासून मानवाची अधोगती होणार नाही याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री सरोदे यांनी तर आभार कविता पाटील यांनी मानले



