भुसावळ – येथिल ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लीश मिडीयम स्कूल मध्ये शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिक्षा व बस चालकांच्या ड्रायव्हर व मालकांसाठी ताप्ती पब्लिक स्कूल व वाहतूक पोलिसांतर्फे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर,वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार संजय भदाणे,वाहतूक पोलीस हेड कॉन्टेबल भाऊसाहेब पाटील,शिरीष झांबरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी ने आन करणाऱ्या रिक्षा चालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब पाटील यांनी रिक्षा चालकांना सांगितले की सर्वांनी ड्रेसमध्येच यावे,गाडीचे कागदपत्र सोबत ठेवावे,लायसन्स सोबत ठेवावे,शाळेतील विद्यार्थी ने आन करत असताना रिक्षामध्ये ज्वलनशील पदार्थ नसावे,रिक्षाच्या बाहेर किंवा बसच्या बाहेर विद्यार्थ्यांना हात काढू देऊ नये , विद्यार्थ्यांचे दप्तर हे बाहेर लटकवू नये , पाणी किंवा पाण्याची बाटली फेकू देऊ नये,वाहतुकीचे नियम पाळावे,सीट बेल्ट लावावे,जास्त विद्यार्थी रिक्षामध्ये कोंबून बसऊ नयेअशा विविध प्रकारचे वाहतूकीचे नियम बद्दल मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
भुसावळ शहरात ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये रिक्षा चालकांना याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी सांगितले की जे ड्रायव्हर किंवा रिक्षा चालक आज मिटींगला हजर नसतील त्यांना यापुढे शाळेचे आवारात येऊ दिले जाणार नाही.रिक्षा चालकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळेत आणायला पाहिजे व घरी न्यायला पाहिजे ,एखादा विद्यार्थी जर का आजारी असेल तर त्याला शाळेत आणू नये असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले. सूत्रसंचालन शिरीष झांबरे यांनी तर आभार वाहतूक शाखेचे संजय भदाणे यांनी मानले.

फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना वाहतूक शाखेचे भाऊसाहेब पाटील सोबत संजय भदाणे, दत्तात्रय चौधरी आदी.


