ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेवर गुरु व शिष्यांचा सजीव देखावा व नाटिका सादर केले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी गुरुवर्य शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन गुरुपौर्णिमा साजरी केली.
यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की गुरु विना ज्ञान नाही, गुरुविना शिक्षा नाही,आपला सर्वात मोठा गुरु म्हणजे आपले आई-वडील हे होय,आई-वडिलांचा सन्मान करा हीच खरी गुरुदक्षिणा आहे.
यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रद्धाली घुले,मनाप्रित कौर,प्रतिभा काकडे,जयश्री मोरेस्कर,गायत्री घिर्णीकर,आरती पाचपांडे,शितल बुला,माया सोनवणे,किरण तांबेकर सह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..

फोटो कॅप्शन – भुसावळ येथिल ताप्ती पब्लीक सीबीएसई इंग्लीश मिडीयम स्कुल मध्ये गुरु पोर्णिमे निमीत्त नाटीका सादर करतांना विद्यार्थी.