सिकंदराबाद ते भावनगर टर्मिनस विशेष गाडी :



भुसावळ – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सिकंदराबाद ते भावनगर टर्मिनस दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
सिकंदराबाद ते भावनगर टर्मिनस विशेष गाडी (८ फेरी)
०७०६१ विशेष सिकंदराबाद येथून दिनांक १९.०७.२०२४ ते ०९.०८.२०२४ पर्यंत दर शुक्रवारी २०.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०५.५५ वाजता भावनगर टर्मिनस येथे पोहोचेल (०४ फेरी)
०७०६२ विशेष भावनगर टर्मिनस येथून दिनांक २१.०७.२०२४ ते ११.०८.२०२४ पर्यंत दर रविवारी १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १५.४५ वाजता सिकंदराबाद येथे पोहोचेल (०४ फेरी)
थांबे -: मेडचल, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, भुसावळ, नंदुरबार, सुरत, वरोदरा, अहमदाबाद, विरंगम, सुरेंद्रनगर, बोटाड, ढोला, सोनगढ, सिहोर.
सरंचना -: १ प्रथम वातानुकूलित, दोन वातानुकूलित द्वितीय ,३ वातानुकूलित-तृतीय, १२ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (२४ डब्बे)
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.