भुसावळ – मोबाईल गेम मुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर नकळतच परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे दिवसेंदिवस
विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुलर्क्ष होत आहे याकरिता
पालकांनी विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देऊ नये.यासह अन्य सुचना येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिंसीपल निना कटलर यांनी पालकांसाठी खास संदेश दिला आहे
शहरातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मोबाईल मधील गेम मुळे होणारा परिणाम लक्षात घेता तसेच मोबाईलच्या गेम मुळे अतिरेक होऊन विद्यार्थ्यांच्या जीवावर सुद्धा बितले आहे यासाठी ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी सांगितले की सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलांकडे चांगले लक्ष दिले पाहिजे. मुलं रोज मोबाईल खेळतात पण त्यामध्ये काय खेळतात हे पाहायला हवे.काही गेमचे ॲप हे इल्लीगल आहेत, हे ॲप मुलांना या वयात डाऊनलोड करू देऊ नये. बहुतेक गेमिंग ॲप हे विद्यार्थी त्यांच्या आई-वडिलांच्या मोबाईलवरून चोरी छुपे डाउनलोड करतात आणि त्यावर गेम खेळतात.
हे गेमिंग ॲप लहान मुलांना गेम खेळण्यासाठी आकर्षित करतात. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यापर्यंतच्या वयातील विद्यार्थ्यांना एवढी समज नसते.
हे ॲप वाले आधी या मुलांना काही गेम्स जिंकू देतात. व मुलांना या गेमची सवय झाली की ते ॲप्स वाले या मुलांना हा गेम जिंकू देत नाहीत. त्यामुळे मुलं हे गेम हरायला लागले की त्यांच्या मनाची स्थिती बिघडत जात असते. त्यामुळे त्या मुलांचं घरात लक्ष लागत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही. परंतु हे मुलं गेम सोडण्याचा प्रयत्न करत असले तरी हे गेमचे ओनर्स आहेत हे आपल्या मुलांना ब्लॅकमेल करतात. त्या मुलांचा फोटो मिक्सींग करुण कोणत्याही महिलेसोबत जोडण्यात येतो. आणि त्यांना ब्लॅकमेल केले जाते. त्यामुळे हे मुले इतके घाबरून जातात की ते शाळेत सुद्धा येत नाही व घरी आई-वडिलांना सुद्धा काही सांगू शकत नाही. तर काही मुलं हे स्वतःच बर वाईट करण्याचा प्रयत्न करतात
तर काही मुलांनी स्वतःची जिवन यात्रा देखिल संपवली आहे. तरी सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांचा मोबाईल चेक करा, तुमचा मुलगा youtube वर काय सर्च करतो ते सुद्धा चेक करा व कोणता गेम डाउनलोड केलेला आहे कोणता गेम खेळतो हे चेक करा.
शक्यतो लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका.असेही आवाहन यावेळी निना कटलर
यांनी केले .



