भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागातील एकुण 34 कर्मचारी यांना उत्कृष्ट कार्यासाठी मे -2024 आणि जून-2024 करिता मॅन ऑफ द मंथ, व वुमन ऑफ द मंथ, पुरस्कार साठी नामांकित कर्मचारी, टिकट चेकिंग मध्ये सर्वाधिक राजस्व प्राप्त , सर्वाधिक तिकीट विक्री, सर्वाधिक महसूल संकलन, सर्वोत्तम वक्तशीरपणा, आदान प्रदान या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
मंडल रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते सर्व नामांकित कर्मचारीना त्यांचा उत्कृष्ट कार्यासाठी प्रशस्ति पत्र व रोख देउन में 2024 व जून-2024 सम्मानित करण्यात आले।
या कार्यक्रमास अपर मंडल रेल प्रबंधक (प्रशासन) सुनिल कुमार सुमन व अपर मंडल रेल प्रबंधक (तकनीकी) मुकेश कुमार मीना, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी . एन एस काजी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.





