चित्रकला प्रेमींसाठी खुषखबर : भुसावळ रेल्वे मंडळ द्वारा 14 व 15 जून रोजी चित्रकला स्पर्धाचे आयोजन :


भुसावळ – भुसावळ रेल्वे मंडळातर्फे चित्रकला प्रेमींसाठी उत्साहवर्धक चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
– ही स्पर्धा १८ वर्षांवरील वयोगटांसाठी आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या सहकलाकारांसाठी ही त्यांची कला व्यक्त करण्याची संधी आहे.
ही स्पर्धा दिनांक 14 जून 2024 रोजी ते 15 जून 2024 पर्यंत सकाळी 09 ते 9 वाजेपर्यंत या कालावधीत ताप्ती क्लब, भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी, विभागीय वाणिज्य प्रबंधक बी.बी. तपस्वी फोन नंबर – 7219611951 वर संपर्क साधू शकता.
भुसावळ मंडळातर्फे प्रथम विजेत्या स्पर्धकास 25 हजार रुपये, द्वितीय विजेत्या स्पर्धकास 15 हजार रुपये आणि तृतीय विजेत्या स्पर्धकास 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना भुसावळ मंडळातर्फे स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सर्व कलाकारांनी सहभागी व्हावे. आणि आपली सर्जनशीलता दाखवण्याची संधीचा फायदा घ्यावा.असे भुसावळ रेल्वे मंडळाने आवाहनं केले आहे