भुसावळ –
भुसावळ नगरपरिषद भुसावळ च्या वतीने आज भुसावळ शहराच्या वाढते तापमान लक्षात घेता वृक्ष लावून त्याचे संवर्धन संगोपन करणे ही गरज आहे आणि भुसावळ शहर हरित शहर स्वच्छ शहर करण्यासाठी भुसावळकरांचे खूप मोठे सहकार्य भुसावळ हरित करण्यासाठी लागणार आहे यासाठी नगरपरिषदेने 10 एच ओ डी अधिकारी नेमले असून प्रत्येक एचओडीला 1000 वृक्षाचे टारगेट दिले आहे या माध्यमातून 21 जून पर्यंत दहा हजार झाडे लागली जातील यासाठी नागरिकांनी एचडी यांना सहकार्य करावे . असे आवाहन केले . या सर्व कामे भुसावळ नगर परिषदेचे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील सर यांचे खूप मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते .आज वृक्ष लावण्या संदर्भात भुसावळ शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती ही निर्माण झाली आहे यात नाना पाटील सर यांची भूमिका खूप मोठी आहे . असेही मुख्याधिकारी यावेळी म्हणाले आणि याची सुरुवात म्हणून भुसावळ नगरपरिषदेतील सर्व प्रमुख अधिकारी यांनी आज प्रत्यक्ष प्रत्येकी दहा दहा झाडे दहा-बारा फुटाची विकत घेऊन ती लावण्याचे प्रयोजन केले. मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी स्वतः 53 तर कर्मचारी यांनी 80 झाडे घेऊन वॉटर सप्लाय विभाग च्या जागेत वृक्षारोपण केले . व प्रत्येकाने लावलेला वृक्षाचा फोटो डीपी वर ठेवावा .
नगरपरिषदेच्या या जागेवर मुख्याधिकारी महेश वाघमोडे अग्निशमन विभागाचे विवेक माकोडे पर्यावरण नागर प्रतिष्ठानचे तथा भुसावळ नगरपरिषद चे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील सर उपमुख्यधिकारी शेख परवेश साहेब उपमुख्याधिकारी लोकेश जी ढाके माझी वसुंधरा चे प्रमुख दीपक चौधरी आरोग्य विभागाचे प्रदीप पवार वृक्ष समितीचे सतीश देशमुख वैभव पवार यांनीही वृक्ष घेऊन आपापल्या विभागात वृक्षारोपण करणार आहे .
यावेळी भुसावळ नगर परिषदेचे ब्रँड अँबेसिडर व पर्यावरण नागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील यांनी यावर्षी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश जी वाघमोडे यांनी पुढाकार घेत वृक्षारोपणाला सुरुवात केली त्या अनुषंगाने सर्व कर्मचारी वर्गानेही वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली नागरिकांनीही किमान एक वृक्ष लावले आणि ते जगवले तर निश्चितच आपला भुसावळ शहर हरित होण्याबरोबर स्वच्छ शहर होईल व आपण ज्या उष्णतेच्या लाटा सहन करत आहोत त्या निश्चितच प्रत्येकाने एक झाड लावले व जगविले तर दोन लाख झाडे सहज लागली जातील .त्यामुळे यावर्षी माझं एक झाड माझ्यासाठी माझ्या शहरासाठी या ब्रीद ने वृक्षारोपण करूया असे सांगितले .
मी लावले माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी झाड तुम्ही केव्हा लावत आहे तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी झाड यानुसार जास्तीत जास्त झाडे लावूया आणि त्याचे संवर्धन संगोपन करूया तरच पुढील जीवन सुखकर होईल .
आज झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला माननीय मुख्याधिकारी महेश वाघमोडे विवेक माकोडे नाना पाटील सर दीपक चौधरी प्रदीप पवार लोकेश ढाके प्रवेश शेख वैभव पवार भिका सोनवणे रमेश भाऊ त्यासोबतच अग्निशमन विभागाचे कर्मचारी वर्ग वॉटर सप्लाय विभागाचे कर्मचारी वर्ग माझी वसुंधरा चे कर्मचारी व इतर कर्मचारी वर्गाचे ही मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले .
त्याचप्रमाणे भुसावळ शहरातील व नगरपालिकेतील डॉक्टर तसेच शिक्षक व नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग वृक्ष लावण्यासाठी सुरू झालेला आहे प्रत्येकाने वृक्ष लावून त्यासोबत वैयक्तिक फोटो काढावा व त्या वृक्षाचे संगोपन संवर्धन करा असे प्रत्येकाने केले तर भुसावळ शहरात जवळपास दोन ते अडीच लाख वृक्ष लागले जातील .हे यशस्वी झाले तर अनेक समस्या या दूर होतील असे प्रतिपादन केले

नाना पाटिल सर अहिल्यादेवी: श्री नाना पाटील यांनी
प्रत्येक नागरिकांनी लावलेल्या झाडा समवेत वैयक्तिक फोटो काढलेल्या ठिकाणी
एक झाड माझ्या शहरासाठी
व
झाडे लावा झाडे जगवा
असे फोटो एडिट करून फोटो प्रत्येकाने डीपीवर ठेवा जेणेकरून भुसावळ वासियांना एक समान संदेश जाईल आणि प्रत्येक नागरिक वृक्ष लावण्याचा प्रयत्न करील .ही संकल्पना राबविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे .त्यानुसार अनेकांनी कालपासूनच डीपीवर तसे फोटो ठेवण्याचे सुरुवाती ही झाली आहे




