रावेर – रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संशयित ( ठाकूर) यांना दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना जळगांव लाच लुचपत विभागाने त्यांना रंगेहात पडकल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान,ही कारवाई (ता. १२) जून रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान झालेली असून संशयित आरोपी पोऊनि ठाकूर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, सदरील संशयितास ताब्यात घेण्यात आले असून पथक जळगांव कडे रवाना झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे


