चला हरित भुसावळ करु या.. “मिशन ग्रीन भुसावळ “चळवळ उभी करण्यासाठी ५ जून रोजी बैठकीचे आयोजन ;

भुसावळ – शहराचे व परीसराचे वाढते तापमान आणि भविष्यातील बिकट संकटांचा विचार करता आता सर्वांनी एकत्र येऊन ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे, आपण सर्वच आपापल्या स्तरावर पर्यावरण संबंधित कार्य करत असतो पण म्हणतात ना “संघ शक्ती युगे युगे” आणि म्हणूनच आपण एकत्रित आलो तर अधिक चांगले आणि अधिक प्रमाणात हे कार्य करून एक चळव‌ळ उभारून अनेकांना प्रेरणा सु‌द्धा देऊ शकतो. मित्रहो,” अभी नहीं तो कभी नहीं “! म्हणून येताय ना!
दि. 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संध्याकाळी 6.30 वाजता रामानंद हाँल समोरील अद्वैतानंद योगा स्टुडिओ मध्ये ही चळवळ उभी करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भुसावळ मधील पर्यावरण प्रेमी नागरिक आणि संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्व पर्यावरण प्रेमी नागरिक , सर्व भुसावळ तालुक्यातील संस्था, प्रतिष्ठान,मंडळे यांचे पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून भुसावळ शहराप्रती आपली कृतज्ञता दर्शवावी…तसेच याकामी सर्व सुज्ञ नागरिकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
जरूर या… आपल्या भुसावळ साठी आणि आपल्या पुढील पिढयांच्या निसर्गरम्य भविष्यासाठी !