वरणगाव – जिल्ह्यात मागील आठवड्या पासुन एका मागून एक खुनाची मालीका सुरूच असुन वरणगाव शहरात बाजार पेठेतील वर्दळीच्या ठिकाणी दुपारच्या वेळेस दोन मोटर सायकली समोरा समोर आल्या च्या कारणावरून झालेल्या वादातून चाकू हल्यात एक ठार तर तीन जखमी झाल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून गुन्ह्यातील संशयीत आरोपी पसार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

या बाबत पोलीसाच्या सुत्रा नुसार असे की की दि ४ मंगळवार रोजी शहरातील नगर परिषद कार्यलया जवळील चौकात दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोन मोटर सायकल समोरा समोर उभे ठाकले होते मोटर सायकल आधी तुझी गाडी काढ तर तुच तुझी गाडी बाजुला काढ असे बोलण्याच्या वादातून एकाने जवळील चाकुने आरीफ सय्यद अली (२८ ) यांच्या मानेवर व छातीवर सपासप वार करून जखमी केले तर याच्या सोबत असलेला आकीब कमरअली (२९ ) , सय्यद मुस्ताक अली (५० ) समीरखान अजीज खान (२८ ) यांनाही चाकुने भोसकून जखमी करत संशयीत आरोपी घटना स्थळावरून पसार झाले
घटनेची वार्ता शहरात पसरताच बाजारा पेठेतील दुकाने पटापट बद झाली तर जखमी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करुण पुढील उपचारासाठी डॉ उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले असता त्यातील गंभीर जखमी झालेल्या आरिफ आली सय्यद आली तपासणी अंती मृत घोषित केल्याचे पोलीसानी सांगीतले
फॉरेन्सिक तज्ञ दाखल
घटनेची माहिती मिळताच सह निरिक्षक भरत चौधरी यांनी सहकार्या सोबत घटना स्थळ धाव घेत वरिष्ठना घटनेची माहिती देऊन फॅरेन्सिक तज्ञाना पाचारण करीत तज्ञानी घटना स्थळवरील रक्ताचे अकरा ठिकाणचे नमूने घेतले
उप विभागीय अधिकारी दाखल
घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे घटना स्थळी दाखल होत पसार झालेल्या संशयीत आरोपीचा शोध घेण्या कामे मार्गदर्शन करून दोन शोध पथके रवाना केले असून वरणगाव पोलीस स्टेशनला तळ ठोकून आहेत
या घटनेला मागील काही महिण्यापुर्वी झालेल्या आपशीवादातून तर झाले नाही ना ! याचा शोध पोलीस घेत आहे
या बाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नव्हता



