राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी तिघांची निवड

भुसावळ:- भारतीय टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनच्या मान्यतेने गुजरात टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित सब- ज्युनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अहमदाबाद गुजरात येथे होत असून या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील तिघांची निवड झाली आहे.
नुकत्याच नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचा समर्थ मालवेकर, भुसावळ चा रणबीर यादव तर जामनेर चा रिजवान शेख या तिघांची महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली आहे.
स्पर्धेत देशभरातील 32 राज्य संघांनी सहभाग घेतला असून या स्पर्धेतून श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड होणार आहे.
निवडलेले खेळाडू नागपूर येथे शिबिरात सहभाग घेतील व तेथून उत्कृष्ट खेळाडूंचा भारतीय संघासाठी निवड होणार आहे…….

*फोटो डावीकडून *
समर्थ मालवेकर, रणबीर यादव व शेवटी रिजवान शेख….