भुसावळ – येथिल रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता सौरभ गोयल,मंडल विद्युत अभियंता अंकुर यादव यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. सौरभ गोयल यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.
प्रसंगी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महिला प्रदेशउपाध्यक्ष दिपाली पाटील, जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष सारिका पाटील, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष संदीप पाटील,सीआरएमएस संघटनेचे मंडल आध्यक्ष व्हि.के.समाधीया,रेल कामगार सेनेचे ललित कुमार मुथा,एनआरएमयु शाखाचे सचिव ललित भारंबे, संजय भारंबे,एससीएसटी असोसियेशन चे विशाल सपकाळे,ओबीसी चे महेश राणे,एबीसीई युनियनचे भूपेन घोलप,रेल कामगार सेना शाखा अध्यक्ष संजय चौधरी,संतोष सिंग,रुपसिंग पाटील,रणजीत चौधरी,दिलीप राजपूत,विष्णू सिंग,बिंकू कुमार,ललित चौधरी,दिपक पाटील,राजीव कुमार सिंग,अजय महाजन,सुधीर कुमार,बाळू चौधरी,आशिष शिसोडिया,लाखान सिंग,जसवंत सिंग,अमित भोळे,सुधांशु कुमार,नितीन परदेशी,आयुष सिंग,दीपक पाटील,दीपक बोराडे,भूषणसिंग राजपूत,लक्ष्मण चौधरी,मोहन राजपूत,नयन सिंग राजपूत,यश राजपूत,राहुल राजपूत,जितेंद्र पाटील यांच्यासह रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.मुन्साफ अली यांनी सूत्रसंचालन केले तर
रणजित चौधरी यांनी आभार मानले.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त उपस्थित रेल्वे कर्मचारी.


