वरणगाव –

वरणगाव येथे एका २४ वर्षीय तरुणीचा रेल्वेचा धक्का लागल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुळ रावेर तालुक्यातील तासखेडा येथील रहिवाशी व सध्या आई व भावा सोबत वरणगाव येथे राहणारी स्वाती भिमराव तायडे (२४) हि तरुणी एका खासगी रुग्णालयात काम करत होती. दि १० शुक्रवार रोजी सकाळच्या ती सिध्देश्वर नगर येथे राहणाऱ्या मोठ्या बाहिणी कडे जात असताना स्टेशनच्या थोड्याच अंतरावर अज्ञात रेल्वे गाडीचा जोरदार धक्का लागल्याने तरुणी जागीच ठार झाली. या बाबत स्टेशन मास्तरच्या खबरी वरून रेल्वे पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


