भुसावळ तालुक्यातील साकरी येथे महारक्तदान शिबिर संपन्न:
भुसावळ – क्रांतीसुर्य महाराणा प्रताप सिंह जी यांच्या जयंती निमित्त भुसावळ तालुक्यातील साकरी येथे दिनांक ९ रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व प्रथम महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्षा दिपाली पाटील यांनी प्रतिमा पुजन केले.
त्यानंतर महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, दिपाली रविंद्र पाटील,जिल्हाध्यक्ष सारिका पाटील,युवा जिल्हाध्यक्ष संदीप राणा,आनंदा पाटील,श्याम गोविंदा सह समाज बांधव उपस्थित होते.या शिबिरात ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेमंत बोदर, दीपक बोदर,लकी बोदर,निखिल चौधरी,यश चौधरी, देविदास चौधरी यांनी परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन – साकरी येथे रक्तदान करताना दिपक बोदर सोबत दिपाली पाटील,सारिका पाटील,संदीप राणा, हेमंत बोदर, लकी बोदर,निखिल चौधरी,यश चौधरी, देविदास चौधरी
आदी. छाया – श्याम गोविंदा भुसावळ )
………………………..


