भुसावळ प्रतिनीधी,
भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत भरत शालिग्राम बोंडे यांची मोटरसायकल चार मे रोजी घरासमोरून चोरीस गेली होती.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या अनुषंगाने पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडघन,पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव,पो हे कॉ विजय नेरकर,यासीन पिंजारी,महेश चौधरी,पोलीस नायक सोपान पाटील,राहुल वानखेडे,सचिन चौधरी,जावेद शहा यांचे पथक नेमण्यात आले होते या पथकाने एका आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकली हस्तगत केल्या आहे .
या पथकाने आरोपी किरण उर्फ करण शालिग्राम पाटील वय २५ राहणार गजानन महाराज मंदिराजवळ मुक्ताईनगर यास पाच मे रोजी ताब्यात घेतले असता त्याला विचारपूस केल्यानंतर त्याने बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत तीन जळगाव जिल्हा पोलीस स्टेशन हद्दीतील एक व मलकापूर सिटी पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अशा पाच मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे.यात आरोपीने चोरी केलेल्या प्लॅटीना,हिरो होन्डा शाईन,एच एफ डिलक्स या प्रकारच्या पाच मोटरसायकली बाजार पेठ पोलीसांनी जप्त केल्या आहेत .


