भुसावळ तालुका विधानसभा अध्यक्षपदी सागर वानखेडे यांची नियुक्ती …

भुसावळ :- जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या भुसावळ तालुका विधान सभा अध्यक्षपदी सागर वानखेडे यांचे नियुक्ती करण्यात आली. जळगाव काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट कैलास शेळके यांनी नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.

या नियुक्तीबद्दल जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार रावेर यावल विधानसभाचे आमदार शिरीष दादा चौधरी .जिल्हा परिषद चे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे. प्रदेश सचिव राहुल मोरे अनुसूचित जाती विभाग आदींनी सागर वानखेडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत . .