भुसावळ – आज दिनांक ५ मे २०२४ रविवार रोजी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक २२मध्ये जय मातृभूमी चौक, प्रोफेसर कॉलनी येथे सायंकाळी ५ वाजता , भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार दौरा आयोजित केलेला आहे

प्रचारास भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परिक्षितभाऊ बऱ्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहराध्यक्ष युवराज लोणारी, बूथ विस्तारक रमाशंकर दुबे, सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे यांनी केले आहे.


