छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अदिलाबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्स्प्रेसचा बल्हारशाहपर्यंत विस्तार

मध्य रेल्वे करणार विस्तार गाडी क्रमांक 11401/11402 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आदिलाबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह पर्यंत/तेथून पुढील आदेशापर्यंत खाली दिलेल्या तपशीलानुसार असेल:

ट्रेन क्रमांक 11401 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस दि. ०५.०५.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १६.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.४५ वाजता बल्हारशाह येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 11402 आदिलाबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्स्प्रेस आता दि. ०७.०५.२०२४ पासून आदिलाबादऐवजी बल्हारशाह येथून ०८.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

संरचना : एक प्रथम वातानुकूलित, एक वातानुकूलित द्वितीय कम वातानुकूलित तृतीय, दोन वातानुकूलित-तृतीय, १० शयनयान, ४ जनरल सेकंड क्लाससह २ जनरल सेकंड क्लास गार्डचे ब्रेकव्हॅन

आदिलाबाद आणि बल्हारशाह दरम्यान सुधारित थांबे : पिंपलखुटी, वणी, भांदक आणि चंद्रपुर

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.