४०% दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध मतदारांसाठी होम वोटिंगबाबत आढावा बैठक …


भुसावळ – १२भुसावळ विधानसभा मतदार संघातील दिव्यांग, अंध, ८५ वर्षांवरील वृध्द, अंथरुणाला खिळलेले मतदार किंवा मतदानासाठी मतदान केंद्रावर येऊ शकत नाही असे अपंग, अंध, जीर्ण आजाराने ग्रासलेले असे एकूण ११7 मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणीही मतदानापासून वंचित राहता कामा नये यासाठी वरील मतदारांच्या घरी दिनांक ०४/०५/२०२४ रोजी एक टीम जाऊन त्यांना मतदानाविषयी माहिती देऊन त्यांचेकडून पोस्टल बॅलेट पेपरवर मत नोंदवून ती मतपेटी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा करतील. संबंधित मतदार घरी उपलब्ध नसल्यास दुसऱ्या दिवशी दि.०५/०५/२०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे .त्यासाठी नेमून दिलेल्या पथकामध्ये BLO, पोलीस, एक मतदान अधिकारी, झोनल, व्हिडिओग्राफर, मायक्रो ऑब्झर्व्हर यांची टीम असणार आहे. अशा एकूण १४ टीम विविध ठिकाणी नेमण्यात आल्या आहेत. अशी माहिती म. गट विकास अधिकारी श्री सचिन पानझाडे पं. स. भुसावळ सो.यांनी दिली . यावेळी मा. प्रांताधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील सो. यांनी कर्मचार्यांना मतदानाच्या वेळी कोणती काळजी घ्यायची या सूचना दिल्या. सदर बैठकीस म.निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर सो. उपस्थित हो