महायुती सरकारचा जैन समाजाच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय :

महाराष्ट्र राज्य जैन कल्याण महामंडळाची लवकरच स्थापना करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

जैन समाजाच्या न्याय व हक्कासाठी, साधु संतांच्या रक्षणासाठी, जैन समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सबलीकरणासाठी, जैन समाजाच्या विकास व उन्नतीसाठी ‘जैन विकास आयोग’ स्थापन करावा या मागणीसाठी ललित गांधी आणि संदीप भंडारी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ आणि भाजप जैन प्रकोष्ठ च्या वतीने ‘मिशन जैन वेल्फेअर कमिशन’ अभियान राबविण्यात येत होते. या मोहिमेच्या समर्थनार्थ राज्यातील 160 हून अधिक आमदार आणि 28 खासदारां च्या समर्थथांची पत्रे ही भाजपा जैन प्रकोष्ठच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकत्रित करण्यात आली होती.

कोल्हापुरात जैन अल्पसंख्याक महासंघातर्फे आयोजित “जैन जागृती अभियान” समारंभात राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी सर्व आमदार व खासदारांच्या समर्थांनाची पत्रे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सुपूर्द करून जैन आयोग स्थापन करण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र जैन आयोगाची आवश्यकता का आहे, याची माहितीही ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली.

एकनाथ शिंदे यांनी जैन समाजाची मागणी मान्य करताना सांगितले की, जैन समाजातील साधू संतांचे संरक्षण, जैन मंदिरे, जैन तीर्थक्षेत्रांचे संरक्षण आणि जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून लवकरच ‘महाराष्ट्र राज्य जैन विकास महामंडळ’ स्थापन करण्यात येईल असे आश्वासन दिले. देशाच्या आणि राज्याच्या विकासात जैन समाजाचे नेहमीच महत्त्वाचे योगदान राहिले असून जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युती सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

जैन समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक निर्णय असून, त्यांच्या फायदा जैन समाजातील प्रत्येक घटकाला होईल. भाजपा जैन प्रकोष्ठच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमामुळेच हे यश प्राप्त झाले आहे असे भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस विकास आच्छा, प्रीती पाटील, सोनल मगदूम, अमित व्होरा, प्रितेश कर्नावट, मेघ गांधी, प्रीतम बोरा, प्रशांत गौडजे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय जैन सेने चे शाखा प्रमुख तथा भुसावळ विधानसभा समन्वयक चेतन जैन हेमावत,, गजेंद्र रुईकर,प्रशांत बजाज,सतीश गोसावी,अमोल वास्कर,विजय आंबेकर,अजय कासलीवाल,गौतम चोरड़िया,योगेश वास्कर,जीतेश अवतारे,आदी पदाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान होते.