०२ रोजी मुंबई आणि नागपूर दरम्यान एकेरी विशेष ट्रेन

मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दि. ०२.०५.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत.

गाडी क्र. 02103 अतिजलद एकेरी विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. ०२.०५.२०२४ रोजी ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.32 नागपूर येथे पोहचेल.

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा

संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय सह वातानुकूलित तृतीय, तीन वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणी दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह.

आरक्षण: 02103 साठी बुकिंग दि. ०१.०५.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर सुरू होईल.

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.