भुसावळ विभागातील खामगांव येथे यार्ड रिमोडूलिंग कार्यासाठी जलंब ते खामगांव दरम्यान शटल सेवा मध्ये बदल करण्यात आला होता. दिनांक २८.०४.२०२४ रोजी खामगांव येथील यार्ड रिमोडूलिंग चे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. या कार्यामुळे खामगांव येथील प्रवासी प्लॅटफार्म मध्ये सुधार करण्यात आले आहे कि जेणे करून १६ कोचची गाडी पूर्णपणे प्लॅटफॉर्म येथे पूर्णपणे समायोजित होईल. या सुविधा मुळे खामगांव ते पंढरपूर विशेष गाडी साठी सुविधा होईल. यार्ड रिमोडूलिंग कार्यामुळे प्लेसमेंट आणि रेक काढून टाकण्याच्या दरम्यान शंटिंग चे कार्य कमी होईल. दरम्यान दिनांक ३०.०४.२०२४ पासून जलंब ते खामगांव दरम्यान शटल सेवा पूर्ववत आणि सुधारित वेळेपत्रकानुसार चालेल. ते पुढीलप्रमाणे –
जलंब ते खामगांव दरम्यान –
१) गाडी क्रमांक ५११०१ जलंब येथून ०४.०० वाजता सुटेल आणि ०४.२० वाजता खामगांव पोहचेल.
२) गाडी क्रमांक ५११०३ जलंब येथून ०९.०० वाजता सुटेल आणि ०९.२० वाजता खामगांव पोहचेल.
३) गाडी क्रमांक ५११०५ जलंब येथून १४.३० वाजता सुटेल आणि १४.५० वाजता खामगांव पोहचेल.
४) गाडी क्रमांक ५११०७ जलंब येथून १७.३० वाजता सुटेल आणि १७.५० वाजता खामगांव पोहचेल.
खामगांव ते जलंब दरम्यान
१) गाडी क्रमांक ५११०२ खामगांव येथून ०४.४० वाजता सुटेल आणि ०५.०० वाजता जलंब येथे पोहचेल.
२) गाडी क्रमांक ५११०४ खामगांव येथून १०.३० वाजता सुटेल आणि १०.५० वाजता जलंब येथे पोहचेल.
३) गाडी क्रमांक ५११०६ खामगांव येथून १५.२० वाजता सुटेल आणि १५.४० वाजता जलंब येथे पोहचेल.
४) गाडी क्रमांक ५११०८ खामगांव येथून २०.४० वाजता सुटेल आणि २१.०० वाजता जलंब येथे पोहचेल.
कृपया प्रवाशांनी या बदलाची नोंद घावी.



