महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या माथेफिरूला अटक करा – समस्त महात्मा फुले समता परिषदतर्फे वरणगावात तीव्र निषेध :

वरणगाव – क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर मागच्या बाजूने रंग फेकणाऱ्या समाजकंटक माथेफिरुला त्वरित अटक करा, त्याला कठोर शिक्षा द्या आणि या घटनेचा तीव्र निषेध महात्मा फुले समता परिषदतर्फे करण्यात आला. वरणगाव पोलिस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी यांना शनिवार दि. २७ रोजी निवेदन देऊन आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यवतमाळ येथे दोन दिवसापूर्वी बहुजन समाजाचे थोर समाज सुधारक महापुरुष क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर मागच्या बाजूने अज्ञात समाजकंटक माथेफिरुने रंग फेकला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बहुजन समाज संतप्त झाला असून हे कृत्य करणाऱ्याला त्वरित अटक करा आणि त्याला कठोर शासन द्या अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव जिल्हातर्फे करण्यात आली आहे. या समाज कंटकाला त्वरित अटक करा अन्यथा महात्मा फुले समता परिषदतर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या घटनेचा तीव्र शब्दात महात्मा फुले समता परिषदचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी यांनी निषेध केला आहे.

वरणगाव पोलिस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी यांना निवेदन देताना माळी समाज अध्यक्ष संजय माळी, महात्मा फुले समता परिषद जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी, महिला तालुकाध्यक्ष सविता माळी, विक्रम माळी, लखन माळी, प्रवीण चांदणे, पुष्पा चौधरी, लक्ष्मी बैरागी, सुशीला हरने, सारजाबाई माळी, मीराबाई भोई, यशोदाबाई माळी, जिजाबाई माळी, सुमन पाटील, समांना फकीर, कमल मोरे, नीलिमा झोपे, कमल तायडे, वर्षा सूर्वसे यांच्यासह अनेकांच्या सह्यांचे निवेदन पोलिस स्टेशनला देण्यात आले.