भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पिंपरखेड ते चाळीसगाव या 32.7 किमी अंतराच्या सेक्शनमधील तिसर्या लाईनचे निरीक्षण रेल्वे संरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी केले. भुसावळ मनमाड तिसर्या 183. 94 किमी लाईनीचे विद्युतीकरण प्रकल्पातील महत्वाचा टप्पा आहे. चाळीसगाव येथील पॅनलरूमचे निरीक्षण करण्यात आले.

या विभागात पिंपरखेड, नायडोंगरी, हिरापूर आणि चाळीसगाव यासह धोरणात्मकदृष्ट्या स्थित स्थानके आहेत. ज्यापैकी प्रत्येक स्थानकाच्या यार्डमध्ये बदल करण्यात आले आहेत. रेल्वे संरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्यासह प्रमुख अधिकारी, डीआरएम ईती पांडे, उपमुख्य अभियंता किशोर सिंह यांनी पिंपरखेड ते चाळीसगाव विभागाची सुरक्षा तपासणी केली. यावेळी रेल्वे अधिकारी, वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते.


