हिंदू सभा न्यासने बलोपासनेने केला हनुमान जन्मोत्सव साजरा :

भुसावळ –
हिंदू सभा न्यास आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिरातील 140 विद्यार्थी विद्यार्थिनीं आणि 17 प्रशिक्षक यांनी आज राम मंदिर वार्ड मधील बडा हनुमान मंदिर येथे सामूहिक मारुतिस्तोत्र म्हणून व बजरंगबैठका मारून बलोपासना करीत हनुमान जन्मोत्सव साजरा केला.अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर हिंदू सभा न्यास तर्फे 15 देश विदेशी शासनमान्य खेळांचे प्राथमिक प्रशिक्षण 15 दिवस दिले जाते .यातून पुढील वर्षी होणाऱ्या शालेय स्पर्धेसाठी खेळाडू निवडले जातात त्यामुळे आजपर्यंत भरपूर विद्यार्थी हे राज्य व राष्ट्र स्तरापर्यंत पोहोचले आहेत .3विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत .या माध्यमातून जवळपास 27 मुलांना आजपर्यंत शासनाच्या स्पोर्ट कोट्यातून नोकरी लागली आहे .मुलांवर शारीरिक आणि मानसिक संस्कार झाले पाहिजे हा आमचा या शिबिर घेण्यामागे उद्देश असतो म्हणून आज या सर्व विद्यार्थ्यांना हनुमान मंदिरात आणून संस्कारक्षम बनवण्याचा प्रयत्न केला असे मत हिंदू सभा न्यास चे उपाध्यक्ष सोनू मांडे यांनी या प्रसंगी व्यक्त केले .
यासाठी शिबिर प्रमुख राजेंद्र कुलकर्णी ,बी एन पाटील सर ,नितीन धुन्द्ये ,सौ वंदना ठोके ,काशीराम बारेला ,पावरा सर ,अजय डोळे व माजी विद्यार्थी प्रशिक्षक खेमचंद पाटील ,गायत्री पाटील,मयूर जाधव ,कृष्णा भारंबे व ईतर यांनी परिश्रम घेतले .