भुसावळमध्ये प्रथमच वारली चित्रकला कार्यशाळा : देवगिरी कल्याण आश्रमाचा उपक्रम :

भुसावळ – येथील गणपत पुंडलिक बर्हाटे या विद्यालयात जनजाती आदिवासी समाजाची प्रसिद्ध कला वारली चित्रकला या कलेची एक दिवसीय कार्यशाळा महिला व मुलांसाठी घेण्यात आली
या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील महिलांनी व शालेय विद्यार्थी असे एकूण 40 जणांनी सहभाग नोंदवला वारली चित्रकला कार्यशाळेचे नियोजन देवगिरी कल्याण आश्रमाच्या भुसावळ जिल्ह्याकडून करण्यात आले होते जनजाती बांधवांची ही कला सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले वारली चित्रकला प्रशिक्षक म्हणून सौ.नयना कापुरे भडगांव या होत्या वारली चित्रकला ही फार जुनी असली तरी जिव्या सोमा मासे आणि त्यांच्या मुलाने 1970 च्या दशकात यात रंगकाम करून या कलेला वेगळे वळण दिले म्हणून जीवाला आधुनिक वारली कलेचा जनक म्हटले जाते काही चिन्ह एकत्रित करून ही चित्र काढली जातात आपल्या फावल्या वेळात ही कला जोपासून घर सुंदर करू शकतात असे यावेळी नयना कापूरे यांनी सांगितले कार्यशाळेचे उद्घाटन परीक्षित बर्हाटे यांच्या हस्ते भारतमाता पूजन व बाळासाहेब देशपांडे यांच्या प्रतिमा पूजनाने झाले अशा प्रकारच्या उपक्रमामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो असे परीक्षित बर्हाटे यावेळी म्हणाले .या कार्यशाळेत महिला व मुलांनी विविध वारली चित्रे पेन्सिल व रंगाच्या साहाय्याने रेखाटली नविन कला शिकण्याचा आनंद यावेळी मुलांच्या चेहर्यावर दिसत होता. सुत्रसंचालन व प्रास्ताविक काशीराम बारेला यांनी तर आभार ॲड सौ‌.जास्वंदी भंडारी यांनी मानले ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ. किशोर मोरे, ॲड चित्रा आचार्य, ॲड जयश्री देशमुख, एस् .के. कापुरे, एल.एल. तेलंग, ॲड.मंजुषा कुलकर्णी, सर्वं पालक व विद्यालयाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले