सेवाजेष्ठता अद्यावत करण्यासंबंधीचे परिपत्रक रद्द करण्यात यावे – विविध संघटनांची मागणी

जळगाव- शिक्षणाधिकारी जळगाव यांनी दिनांक 18 -4 -2024 रोजी सेवाज्येष्ठता याद्या अद्यावत करून पगार बिलांना जोडण्याचा सूचना केलेल्या आहेत त्यासंबंधी सदर परिपत्रक रद्द करण्यात यावे यासाठी विविध संघटनांनी निवेदन दिले .कारण सेवा जेष्ठतेच्या संदर्भात शासनाचे जी.आर.व अधिसूचना संभ्रम निर्माण करणाऱ्या असून कुठल्याही मुख्याध्यापकांना किंवा शाळांच्या क्लर्कला यासंबंधीची पूर्णता माहिती नाही त्यासंबंधी शासनाकडून मार्गदर्शक सूचना मागून. नंतर सर्व मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेऊन त्यासंबंधीची माहिती द्यावी व तदनंतरच सेवा जेष्ठता याद्या अद्यावत व्हाव्या. अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटना, ईस्तु संघटना यांच्या तर्फे निवेदन देऊन करण्यात आली प्रसंगी क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, बहुजन शिक्षक संघ, समन्वय समिती, शिक्षक भारती आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर सेवा जेष्ठता अद्यावत करण्यासंबंधीचे पत्र रद्द होण्याची मागणी केली आहे सदाप्रसंगी डॉ. संजय निकम, प्रशांत नरवाडे ,नारायण वाघ, तुळशीराम सोनवणे, एस. एस. अहिरे, डॉ. संजय भटकर, रवींद्र तायडे, जे.पी.सपकाळे, सुनील वानखेडे, जी.व्ही पाटील, डॉ.प्रदीप साखरे, डी आर धांडे , राजेश अग्रवाल, आर.के. तायडे एस.के. राणे ,बापू साळुंखे, रवींद्र कोल्हेकर, प्रमोद लोंढे, शुद्धोधन सोनवणे आदी उपस्थित होते.