शासकिय महसुल बुडविल्याप्रकरण तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा-केदार सानप


भुसावळ – मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे तत्कालीन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल) पंकज लोखंडे यांच्या कार्यकाळात गट नं. 167/पै/51 व गट नं. 167/पै/36 या वर्ग दोन§ च्या जागा कुठलाही शासकिय नजराणा न भरता तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांनी आदेश क्र. जमीन/2/26/नअश/प्र.क.127/23-24 दि. 6-7-2023 व आदेश क्र. जमीन/2/26/नअश/प्र.क.118/23-24 दि. 5-7-2023 असे बोगस आदेश दिले असून या आदेशावर अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन व तत्कालीन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल) पंकज लोखंडे यांची स्वाक्षरी आहे. याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रार अर्जात नमुद केले आहे की, तत्कालीन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल) पंकज लोखंडे यांच्या कार्यकाळात मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे गट नं. 167/पै/51 व गट नं. 167/पै/36 या वर्ग दोन च्या जागा कुठलाही शासकिय नजराणा न भरता वर्ग एक मध्ये वर्गकरून तत्कालीन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल) पंकज लोखंडे यांनी आदेश क्र. जमीन/2/26/नअश/प्र.क.127/23-24 दि. 6-7-2023 सदरील आदेशामध्ये मुल्यांकनाच्या 50 टक्के अनार्जित उत्पन्नाच्या रक्कम 1 लाख 97 हजार 400 दि.19/6/2023 शासकिय पावती क्र. एमएच 003586002202324 एम अन्वये शासकिय खजिन्यात जमा करून जमेच्या चलनाची प्रत तहसीलदार यांच्या मार्फत सादर केली आहे. व आदेश क्र. जमीन/2/26/नअश/प्र.क.118/23-24 दि. 5-7-2023 सदरील आदेशामध्ये मुल्यांकनाच्या 50 टक्के अनार्जित उत्पन्नाच्या रक्कम 1 लाख 31 हजार 600 दि.14/6/2023 शासकिय पावती क्र. एमएच 0035236412202324 एम अन्वये शासकिय खजिन्यात जमा करून जमेच्या चलनाची प्रत तहसीलदार यांच्या मार्फत सादर केली आहे. सदरील चलन मुक्ताईनगर तहसीलदार यांनी या चलनाचा शोध घेतला असता सदरचे चलन दिसुन येत नाही, असे लेखी पत्र मुक्ताईनगर तहसीदार यांनी केदार सानप यांना दिले आहे.
या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल) पंकज लोखंडे व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी शासनाचा लाखो रूपये नजराणा बुडविल्यामुळे व शासनाची फसवणुक केल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करावा व त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.