भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक 22 रोजी पृथ्वी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी पृथ्वीचे तसेच वृक्षाचे पुजन केले.
निना कटलर यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की.
पृथ्वी दिन हा दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो, आणि हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृ पृथ्वी दिवस म्हणून देखील ओळखला जातो, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना पर्यावरणाला असलेल्या धोक्याची जाणीव करून देणे आणि लोकांना पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. भूसंकल ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होते, अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने आपल्या स्तरावर पर्यावरण रक्षणाचा प्रचार केला प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असे सांगून वृक्ष संवर्धनाचे महत्व सांगितले व पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली यामुळे आपली पृथ्वी सतत बहरत राहील असे ही त्या म्हणाल्या.
यावेळी मनिषा किरंगे,गायत्री घीर्णीकर,धनश्री झांबरे,हर्षला पाटील यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होत्या.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथिल ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पृथ्वी दिनानिमित्त पृथ्वीचे पूजन करताना प्रिंसीपल निना कटलर सोबत मनिषा किरंगे,गायत्री घीर्णीकर,धनश्री झांबरे,हर्षला पाटील आदी.



