भुसावळ – भगवान महावीर स्वामी यांच्या 2623 जन्मकल्याणाक महोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

यावेळेस विशेष म्हणजे भगवान महावीरांची महाआरती ,लेझीम पथक आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती
सकाळी ळ जैन मंदिर येथे भगवंताच्या प्रतिमेचा अभिषेक आणि पूजन तसेच ध्वजारोहण करून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
शोभा यात्रा सकाळी दिगंबर जैन मंदिर, गांधी चौक येथून सराफ बाजार, अप्सरा चौक,डिस्को टॉवर, भारत मेडिकल, अष्टभुजा मंदिर ,साईजीवन सुपर शॉप, ते शितलनाथ श्वेतांबर जैन मंदिर, मातृभूमी चौक येथे संपन्न झाली.
तब्बल 3000 च्या संख्येने जैन समाज बांधव येथे उपस्थित होते.
मोठी मस्जिद, लक्ष्मी चौक येथे राजस्थानी वि प्र समाज संघटने कडून शोभायात्रा वर पुष्पवृष्टी व स्वागत करण्यात आला.
तदपश्चात संतोषीमाता हॉल येथे मंगलाचरण आणि समाज बांधवां साठी स्वामी वात्सल्याचा आयोजन करण्यात आले होते.
तसेच संध्याकाळी सुद्धा जन्म कल्याण महोत्सव समितीद्वारे संतोषी माता हॉल येथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, भक्ती संध्या, व
भगवान महावीर स्वामींचा पाळणा,समता बहु मंडळ कडून आयोजित करण्यात आला होता.
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी
समाज बांधवांकडून लिंबू शरबत, कुल्फी, दूध कोल्ड्रिंक ची सेवा देण्यात येत होती.
परंपरागत व विधिवत पद्धतीने सकल जैन समाज बांधवांकडून आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांनी संपूर्ण शहरवासियांचे लक्ष आकर्षित केले. कार्यक्रमाला यशस्वी बनवण्याकरिता अध्यक्ष
सुमित चोरडिया , उपाध्यक्ष प्रशांत बजाज,
राजेश गेलडा. कोषाध्यक्ष देवेंद्र मेहता, संजय चोरडीया,
जितेश अवतारे, जे.बी. कोटेचा,सतीश साखरे,चेतन जैन हेमावत, गौतम चोरडिया, अजय कासलीवाल, रमेश अन्नदाते, दीपक काठे, प्रदीप गोसावी, महेंद्र कासलीवाल, भूषण चोरडिया, समकित सिसोदिया, गजेंद्र रूईकर, सतीश गोसावी,अल्केश झांबड, कांतीलाल चोरडिया, संजय कोटेचा, योगेश वासकर, शुभम ललवाणी, अमोल वासकर,देवेंद्र निमाणी, राजेश बाफना, अभय सुराणा,विजय अंबेकर,सतीश सोनसले इ. समाज बांधवांची उपस्थिती होती.


